आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्ट सिटीच्या माध्यमातून अक्कलकोट रोड हिंदू स्मशान भूमी लगत असलेल्या एक एकर च्या जागेत भावसार वैकुंठ धाम तयार करण्यात आले आहे. याचे लोकार्पण रविवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आमदार विजयकुमार देशमुख, स्मार्ट सिटी चे माजी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील, भावसार समाजाचे उद्योगपती अनिल ढवळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, दत्तात्रय पुकाळे, श्रीकांत अंबुरे, विजयकुमार पुकाळे, शशिकांत रंगदळ आदी उपस्थित होते.अक्कलकाेट राेडवरील हिंदू स्मशान भूमी लगत भावसार वैकुंठ धाम नव्याने तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी लाेकांना बसण्यासाठी चांगली साेय करण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या आवारात झाडांसह बगीचा ही तयार केला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न वाटत आहे.
शासन निधी, लोकवर्गणीत काम
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करून ही जागा हिंगुलांबिका ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली आहे. याच्या उभारणीसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. इतकेच नाही तर समाज बांधवांनी देणगी गोळा करून २५ लाख रुपये खर्च करून या वैकुंठांमध्ये रस्ते, उद्यान, पथदिवे, पत्राचेशेड, महादेव , भगवान इंद्र ची मूर्ती, पाणी टाकी आदी करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.