आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजप खा. महाडीक यांच्यासोबत, राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी

प्रतिनिधी | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी सिकंदर (तालुका मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला तोंड फुटले आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबतीने निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

सहकारातील नवा पॅटर्न

प्रचाराच्या आरंभीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिक यांना साथ देत सहकारातील नवा पॅटर्न सुरू केला आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये महाडिक यांच्याकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर, विरोधी परिचारक -पाटील गट महाडिक गटाला चोख उत्तरे देऊ लागला आहे.

प्रचारात चेअरमन महाडीक आघाडीवर

कारखान्याचे चेअरमन व राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या गटाच्या प्रचाराचा शुभारंभ मोहोळ तालुक्यातील देवस्थान वडवळ या नागनाथाच्या मंदिरातून केला. त्यांच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सोलापूर जिल्हा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश पाटील हे आवर्जून उपस्थित होते. तसेच त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी देखील हजर होते. राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे चेअरमन महाडिक यांच्या पॅनलची बाजू प्रचाराच्या शुभारंभा दिवशीच भक्कम झालेली दिसते.

परिचारक कुटुंबाची अनुपस्थिती

या उलट परिचारक-पाटील पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी परिचारक कुटुंबाच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी सुरुवातीला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनेल उभा करून निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले होते. परंतु, भैय्या देशमुख यांनी चेअरमन धनंजय महाडिक यांना जाहीर पाठिंबा देऊन विरोधातील पाटील-घाडगे यांच्यावर टीकेची राळ उडवली आहे. भैया देशमुख यांच्या या भूमिकेमुळे चेअरमन व खासदार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांमध्ये प्रचारासाठी प्रचंड उत्साह संचारलेला दिसत आहे. एकूणच भीमा सहकारीच्या निवडणुकीत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच खासदार धनंजय महाडिक यांची बाजू वरचढ होत आहे.

राजन पाटील यांचीही मोर्चेबांधणी

मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी चांगलीच मोर्चबांधणी बांधली. ते शरद पवार यांच्या मर्जीतील असल्याने या निवडणुकीत ऐनवेळी काय होईल हे मतदानाच्या निकालातच समजून येईल.

बातम्या आणखी आहेत...