आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:सेंद्रिय खताचा केक कापून मंगळवेढ्यात झाडांचा वाढदिवस

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आकर्षक फुलं, फुगांची सजावट, रांगोळीच्या पायघड्या, सेंद्रिय खतापासून तयार केलेला केक कापून मंगळवेढ्यात झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर तीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस रविवारी साजरा झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवाराने हा कार्यक्रम घेतला. सेंद्रिय खतापासून तयार केलेला केक कापला. झाडांच्या बुंध्यापाशी केकरूपी खत टाकून पाणी घालण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.. हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हटला.

मंगळवेढ्यात सामाजिक वनीकरण, वारी परिवार, मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी तयार केलेला सेंद्रिय खताचा केक कापून ताे झाडांच्या मुळाशी टाकण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...