आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:भाजप आमदार विजय देशमुखांसह 150 कार्यकर्ते कर्नाटक प्रचारात

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह शहरातील १५० कार्यकर्ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या नियोजनासाठी आमदार देशमुखांनी बैठक घेऊन सूचना केल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ८ मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रकाश म्हंता यांच्या उपस्थितीत गुरुवारी नियोजनाची बैठक घेण्यात आली. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील १५० कार्यकर्त्यांची एक टीम कर्नाटकात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्या कार्यकर्त्यांना बूथ यंत्रणेची सखोल माहिती आहे, ज्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम केल्याचा अनुभव आहे, अशा दीडशे कार्यकर्त्यांचा पहिला जत्थ्था शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली. नगरसेवक संजय कोळी, अमर पुदाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश साखरे, प्रा. नारायण बनसोडे, अजित गायकवाड, सुजित चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.