आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात भाजप आक्रमक:नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या व्यक्तव्यामुळे पाकिस्तानविरोधात आंदोलन, बिलावल भुट्टो यांचा जाळला पुतळा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप सोलापूर शहराच्या वतीने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानसोबत बिलावलचा पुतळा जाळला.

याप्रसंगी बोलताना सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाला वळवणे आणि दिशाभूल करणे हे या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे

विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे म्हणाले, रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कसे वाचवले हे जगाने पाहिले आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली अमिट छाप सोडली आहे, पण दुसरीकडे पाकिस्तानची थट्टा आणि अपमान सहन करावा लागत आहे. बिलावल यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती निषेधार्ह आहे.

नरेंद्र मोदींवर भाष्य करण्याइतपत बिलावल यांचा कौल योग्य नाही. याप्रसंगी संघटन सरचिटणीस रुद्रेशजी बोरामणी, सरचिटणीस शशीभाऊ थोरात,मा महापौर श्रीकांचना यन्नम, परिवहन सभापती जय साळुंके, भाजपा ज्येष्ठनेते,रामचंद्र जन्नू , पांडुरंग दिड्डी, मोहन डांगरे, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, भूपतीशेठ कमटम, दीनानाथ धुळम, चंद्रकांत तापडिया, विजयाताई वड्डेपल्ली, रेखा गायकवाड, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, श्रीनिवास जोगी , रुचिरा मासम, डॉ शिवराज सरतापे, बसवराज केंगनाळकर ,गणेश पेनगोंडा,अनुसूचित जातीचे बाबुराव संगेपान, व्यापार आघाडीचे जयंत होले पाटील, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, दक्षिण भारतआघाडीचे रवी भवानी, ट्रान्सपोर्ट सेलचे सिद्धेश्वर मुनाळे, मंडलअध्यक्ष शिवशरण बब्बे ,महेश देवकर ,शहर कार्यकारी सदस्य मधुकर वडनाल, बिपीन धुम्मा, नागेश गंजी ,विजय इप्पाकायल, जगन्नाथ चव्हाण, सतीश भरमशेट्टी, वैद्यकीय आघाडी नॅचरोपथी डॉ अंबादास लोकुर्ती, प्रकाश म्हंता, सुकुमार सिद्धम ,लिंगराज जवळकोटे, नगरसेवक अविनाश बोंमड्याल, नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, राधिकाताई पोसा, विमल पुठ्ठा, अर्चना वडनाल,युवा मोर्चाचे गणेश साखरे, प्रेम भोगडे, श्रीपाद घोडके, बिपिन धुम्मा ,नरेश पतंगे, मल्लिनाथ कुंभार, गिरीश बत्तुल, भीमाशंकर बिराजदार ,आनंद बिर्रू, दत्तू पोसा,सतीश महाले, अक्षय अंजीखाने आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...