आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भाजपने पाकिस्तानच्या मंत्र्यांचा पुतळा जाळला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजपच्या वतीने शनिवारी देशव्यापी आंदोलन झाले.

सोलापुरात पश्चिम महाराष्ट्राचे नेते मकरंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, शहर सरचिटणीस शशी थोरात, रुद्रेश बोरामणी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, राधिका पोसा, विजया वड्डेपल्ली, पांडुरंग दिड्डी, मोहन डांगरे, मनोज देवकर, अनिल कंदलगी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...