आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एमआयएमने उडी घेतली. तिथे मतांचे ध्रुवीकरण झाले, याचा थेट फायदा भाजपला झाला. आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एमआयएमवर टीका केली. मतांचे ध्रुवीकरण करणारे असरुद्दीन ओवीसी हेच भाजपचे प्रचारक, शिवसेना खासदार सावंत म्हणाले.
खासदार सावंत पंढरपूर येथे आज बोलत होते. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी ते पंढरपुरात आले होते. दर्शन झाल्यानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एमआयएमला व त्यांच्या नेत्यांवर टीका केली. एमआयएमने उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत ध्रुवीकरणासाठी भाजपला मदत केली आहे असे ते म्हणाले.
मैत्रीचा प्रस्ताव नाकारला
आता ओवैसी यांच्याच पक्षाने महाराष्ट्रात आमच्या सोबत मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु आमचा त्यांना विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर फाईलच्या नावाने देशात धुव्रीकरण करण्याबरोबरच भाजपला महाराष्ट्र पेटवायचा आहे, अशी टीकाही श्री. सावंत यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत विरोध दर्शविताना म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकवित असतील तर ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. असे वक्तव्य संजय राऊत यांनी करीत एमआयएमच्या आशेवर पाणी फेरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.