आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; सत्ता गेल्याने ते वैफल्यग्रस्त, राधाकृष्ण विखे - पाटलांचा हल्लाबोल

सांगोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप महसूल मंत्री तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले असून त्यामुळे ते खालच्या पातळीवर टीका करत आहे.

सांगोला येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज महसूल मंत्री ​​राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी सत्ता मिळावी यासाठी मागच्या दाराने जनतेचा विश्वास घात केला. औरंगजेबाच्या भूमिकेचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे त्यांच्याकडून समर्थन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागायला हवी, आणि अशी मुक्ताफळे उधळण बंद करावे.

विखेंची औकात नाही - दानवे

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात आहे काय?. शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचे पूजन करायला अयोध्येला चालले आहेत. याआधी उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन आलेत, त्यांनी मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतेही मोठे काम नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

अजित पवारांनी पातळी सोडू नये

राधाकृष्ण विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमकपणे भूमिका मांडतात पण त्यांनी पातळी सोडू नये. माझ्याकडून तरी राज्यगीताचा अनादर होणार नाही. मी बसेपर्यंतच ते सुरू झाले, ते युरू करत असताना सूचना द्यायला हवी, त्याबद्दल काही संकेत आहेत. तरीही अनवधानाने झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.