आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे नेते, मी त्यांना मोठा नेता मानत नाही; भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पडळकरांची गाडी फोडली

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे नेते आहेत. त्यामुळे मी तर त्यांना मोठा नेता मानत नाही. जे कोणी मानत असतील ताे त्यांचा प्रश्न आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी येथे केली. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द होण्याविषयी पडळकर यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसंदर्भात राज्य सरकारला माहिती मागितली, पण त्यांनी ती वेळेत सादर केली नाही.

राष्ट्रवादी, काँग्रेस हे बहुजनविरोधी आहेत. काँग्रेस नेत्यांच्या मुलानेच न्यायालयात विरोधी याचिका दाखल केली आहे. ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्ये सर्वाधिक आहे. राज्यात या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्थापनेवेळी ओबीसी नेत्यांना का स्थान दिले नाही? उपमुख्यमंत्री ओबीसी का दिला नाही? असा सवालही पडळकर यांनी या वेळी उपस्थित केला.

पडळकरांची गाडी फोडली
बैठकीनंतर पडळकर जाताना एका मंदिराजवळ त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान, हा हल्ला कुणी केला याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...