आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाजपला राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांची काळजी ; बावनकुळे यांना स्पष्टीकरणासाठी पत्र

मोहोळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा भाजपमय करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जेवढी काळजी नाही, तेवढी काळजी सध्या मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी मुक्कामी असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांना कशी काय पडली आहे, याच्या मागील नेमके गोडबंगाल काय आहे, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये नेमके कोण ऐकते, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे नाव न घेता बारसकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थंडीच्या वातावरणात तापत आहेत. पापरी, ता. मोहोळ येथे एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपस्थित भाजप आमदार रणजितसिंह मोहिते यांच्याकडे पहात ‘रणजितदादा आता तुम्ही विधानसभेत जा, तुम्ही म्हणालात तर तुमची वकिली करू.’ असे विधान करत आता तुमच्यातलेही काही लोक आमचे ऐकतात, असे म्हणाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

त्यानंतर त्यांनी जाहीरपणे पापरीच्या कार्यक्रमात असे विधान केल्याने मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी त्यांच्या विधानाचा संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र वरीलप्रमाणे स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रवादी मुक्कामी असणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये जाण्याअगोदर भाजप वाढविण्याचे प्रशिक्षण कसे काय दिले जाते, असे प्रशिक्षण आपण देऊ शकता का, असा पत्रात उल्लेख करून राजन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीची गटबाजी चव्हाट्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा नरखेड जि.प. गटाचे सदस्य उमेश पाटील आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी गेल्या वर्षभरापासून माजी आमदार राजन पाटील यांच्या कारखान्यावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर ठिकठिकाणी जोरदार टीकास्त्र सोडले. मोहोळ तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यामुळे मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

बातम्या आणखी आहेत...