आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील काळवीटाचा अपघात प्रकरण:पर्यावरणीय संस्थांकडून 'त्या’ काळविटांना दुर्घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अन् विभागाच्या टोलवाटोलवी सुरुच आहे. 14 काळविटांचा मृत्यू होऊन आठवड्याचा कालावधी लोटला तरी सुरक्षेच्या अद्याप कोणताही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. शहरातील वन्यजीव प्रेमींनी रविवारी (दि. 5) त्या दुर्घटनास्थळी जाऊन मृत्यूमुखी पडलेल्या काळविटांना श्रद्धांजली वाहिली. आणखी किती दुर्घटनांची प्रशासकीय यंत्रणा वाट पहात आहे? असा प्रश्न पर्यावरण स्नेहींनी उपस्थित केला.

दुर्घटनेस जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पर्यावरण स्नेहींनी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभागास निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील आठवड्यात केगाव-हत्तूर बाह्य वळण मार्गावरील देशमुख वस्ती येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने 15 काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून पडल्याने 14 काळविटांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय वन मंत्रालयाने त्या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. वन विभागाने कळविल्यास, त्या उड्डाणपुलाच्या दुतर्फा आठ फूट उंचीच्या जाळ्या बसविणार् असल्याचे स्पष्ट केले होते. तर, वन विभागाने त्या ठिकाणी संरक्षक उपाययोजना करण्याबाबत यापूर्वीच कळवले होते, असे सांगितले. दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीत आठवड्याचा कालावधी लोटला तरी काहीच हालचाली झाल्या नाहीत.

सर्वसामान्यांमध्ये वन्य प्राण्यांबद्दल आपुलकी, सहानुभूती निर्माण व्हावी व भविष्यात वन्यजीव संरक्षण व्हावे या उद्देशाने रविवारी (दि. 5) सकाळी त्या दुर्घटनास्थळी मेणबत्ती लावून, पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, दोषी प्रशासनाचा धिक्कार करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी पंकज चिंदरकर, संतोष धाकपाडे, अजित चौहान, सुरेश क्षिरसागर, मयांक चौहान, काशीनाथ धनशेट्टी, राजकुमार कोळी अजय हिरेमठ, अरविंद मोटे, बाळासाहेब लामतुरे, लखन भोगे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे इत्यादी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...