आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावध पाऊल:‘शिरोमणी’च्या निवडणुकीसाठी काळे करताहेत मोर्चेबांधणी ; युवकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

पंढरपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकताच मेळावा घेऊन युवकांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत ज्या गोष्टी नडल्या त्यावर काम करण्याला काळे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते.

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना ही एक महत्त्वाची संस्था मानली जाते. श्री विठ्ठल सहकारी आणि सहकार शिरोमणी हे दोन्ही साखर कारखाने विठ्ठल परिवाराची राजकीय, आर्थिक ताकद मानले जातात. त्यापैकी विठ्ठलच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भालके - काळे यांचे नेतृत्वाखाली पॅनलला पराभवाचा धक्का बसला. विठ्ठलच्या निवडणुकीत पराभवाचे मुद्दे लक्षात घेऊन कल्याण काळे सावध पावले टाकत आहेत. त्या अनुषंगाने सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सहकार शिरोमणी साखर कारखाना मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. परिणामी २०२० च्या हंगामात तो बंद ठेवण्यात आला. २०१९ च्या हंगामातील एकूण एफआरपीपैकी काही रक्कम अद्यापही देणे बाकी आहे. त्यामुळे सभासदारांमध्ये नाराजी आहे.

बातम्या आणखी आहेत...