आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात भीषण अपघात:भरधाव बोलेरोची उभ्या ट्रकला धडक, भीषण अपघातात 4 जण ठार, 2 जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धडक इतकी भीषण होती की, बोलेरोचा चेंदामेंदा झाला, कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले

पंढरपूर ते सांगोला रोडवर कासेगाव ( ता. पंढरपूर ) हद्दीत सातवा मैल परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजता रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला बोलेरो जीपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या चार जण जागीच ठार झाले आहेत. एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या भीषण अपघातात दोन महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलगी असे चार जण जागीच ठार झाले आहेत. तर एक पुरुष गंभीर जखमी असून उपचारासाठी पंढरपूर शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रवासी बोलेरो जीपने ( केए ०६ एमबी ९४७६ ) रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडकली. सर्व मयत व जखमी हे चंदगड जि. कोल्हापूर येथील आहेत, अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. इतर जखमींना कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी पाहणी केली. अद्याप मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...