आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजेची आॅनलाईन बुकिंग:श्री विठ्ठलाच्या वर्षभरातील नित्य पूजेचे बुकिंग फुल्ल, मंदिर समितीला 94 लाख रुपये मिळाले उत्पन्न

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंतच्या सर्व नित्य पूजेची नोंदणी पूर्ण झाली असून या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला ९४ लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याची आणि दररोज होणाऱ्या तुळशी अर्चन पूजेलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची दररोज पहाटे नित्य पूजा केली जाते. नोंदणी करून ठरलेल्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या दहा ते १२ नातेवाइकांना नित्य पूजेसाठी सकाळी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते. रुक्मिणी मातेस हळद, कुंकू लावून, देवाला पेढ्यांचा नैवेद्य आणि फळांचा महाप्रसाद पूजा करणाऱ्यांच्या हस्ते दाखवला जातो. या नित्य पूजेसाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो.

तुळशी अर्चन पूजेलाही मोठा प्रतिसाद श्री विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी मंदिर समितीने २०१४ पासून बंद असलेली तुळशी अर्चन पूजा २२ मार्च गुढी पाडव्यापासून पुन्हा सुरू केली आहे. दररोज पाद्य पूजा, धुपारती, नैवेद्य या वेळेत प्रत्येकी १० या नुसार ३० पूजा केल्या जातात. प्रत्येक पूजेसाठी २ हजार १०० रुपये देणगी आकारली जाते. दिवसभरात २७ ते ३० पूजा होतात आणि त्यातून समितीला दररोज ५० ते ६० हजार रुपये देणगी मिळत आहे.