आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:आजोबा गणपती ट्रस्टकडून 500 विद्यार्थ्यांना वह्या वाटप

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री श्रद्धानंद समाज आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने सोलापूर शहरातील विविध भागांतील ५०० विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना प्रोत्साहन व सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी वरिष्ठ डॉ. सुहास करकमकर, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक अमर पुदाले व आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांच्या हस्ते आजोबा गणपतीची महाआरती करण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार ट्रस्टचे खजिनदार चंद्रकांत कळमणकर व सहसचिव कमलाकर करमाळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य सातलिंगप्पा दुधनीकर, योगेश फुलारी, गुरुनाथ निंबाळे, भय्या भास्कर, विजय नंदीमठ, विशाल फुलारी, सागर कोप्पद, सिध्दू सरसंबे, प्रवीण पाटील, निशीकांत धनश्री, चंद्रकांत संग्गा, गणेश वनारोटे, योगेश जेऊरे व वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांनी परिश्रम घेतले.