आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते:दीड लाखाची लाच, दोघे ताब्यात

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या अर्जात सहकार्य करून गुन्हा दाखल न करण्यासाठी दोघांनी एका पन्नास वर्षीय महिलेकडे चक्क दीड लाख रुपयांची लाच मागितली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता दोघे खासगी इसमांचा सहभाग आढळला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

आरोपी युवराज भीमराव राठोड (वय ३७, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, समर्थ नगर, जुळे सोलापूर) व साजन रमेश हावळे (वय ३६ , व्यवसाय - ट्रॅव्हल्स एजन्सी, मंगल रेसिडेन्सी जुळे सोलापूर) या दाेघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. सापळा पथकात पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, स्वप्नील संन्नके यांचा समावेश आहे. सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पर्यवेक्षण केले. राठोड यांनी वंचित आघाडीकडून सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...