आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याची जाळपोळ:क्रीडा कार्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे गुजरातमध्ये नॅशनल गेम्समध्ये धनुर्विद्या खेळात राज्यातील खेळाडू पदकांची कमाई करीत आहेत आणि येथील श्रेया परदेशी व तनिष्का ठोकळ हे दोन खेळाडू मध्य प्रदेशमध्ये ८ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जात आहेत. तर दुसरीकडे सोलापुरातील समाजकंटकांनी नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेले तीन धनुर्विद्या टार्गेट व बट्ट्रेस याची रविवारी रात्रीच्या सुमारास नासधूस केली. एकाला तर त्यांनी चक्क आग लावली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, जुळे सोलापूर भागात या खेळाच्या सरावासाठी मैदान नसल्याने धनुर्धर आर्चरी अकादमीने या मैदानावर सराव करण्यासाठी परवानगी मागितली होती व तशी परवानगी जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिली होती. सुमारे १२ हजार रुपयांचे हे क्रीडा साहित्य सात दिवसांपूर्वी त्यांनी मैदानावर लावले होते. त्यांचा सरावही सुरू झाला होता. परंतु त्यांच्या सरावावर येथील समाजकंटकांनी व्यत्यय आणला आहे. याबाबत त्यांचे प्रशिक्षक दीपक चिकणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.

सुरक्षारक्षक असताना हा प्रकार घडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार आणि इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी पोलिस ठाण्याला पत्र देणार. ’’ नितीन तारळकर, जिल्हा क्रीडाधिकारी समाजकंटकांच्या अशा कृत्यामुळे, मानसिकतेमुळे खेळावर तर परिणाम होतोच आणि जे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आयुष्य समजून हे कार्य करीत असतात त्यांचा आत्मविश्वास ढासळतो.’’ दीपक चिकणे, धनुर्विद्या प्रशिक्षक

बातम्या आणखी आहेत...