आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन आरोपीस अटक झाली. जमीर रशिद शेख (वय २२, रा. नवीन गोदूताई विडी घरकुल), आनंद कृष्णहरी कोडम (वय ४६, रा. आदर्शनगर), अक्षय अंबादास सामलेटी (वय २३, नवीन गोदूताई विडी घरकुल) यांना अटक झाली. त्यांच्या या गुन्ह्यात विधी संघर्षग्रस्त म्हणजे अल्पवयीन बालकाचाही सहभाग आढळला.
एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी व पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. संशयित आरोपींकडून १३ तोळे सोने ज्याची किंमत पाच लाख २० हजार रुपये इतकी आहे, एक मोटारसायकल, १० मोबाइल, व रोख एक लाख ३ हजार असे ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त हरीश बैजल, उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने, तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी, हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलिस नाईक चेतर रूपनर, मंगेश गायकवाड, भारत गायकवाड, अय्याज बागलकोटे, कॉन्स्टेबल सुभाष मंुढे, काशिनाथ वाघे, अश्रूमान दुधाळ, शंकर याळगी, अमोल यादव, किशोर व्हनगुंटी, इकरार जमादार यांनी पाप पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.