आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:सर्व सहलीला गेल्याची संधी साधत घरफोडी; 96 हजारांचा ऐवज चोरला

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकुटुंब गणपती पुळे येथे सहलीला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ९६ हजार रुपयांचा ऐवज पळवला. ही घटना १० नोव्हेंबरला उघड झाली. याबाबत मयूर दिलीप सिद्धनाथ (वय ३२, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

सिद्धनाथ कुटुंबीय सहलीला गेले होते. त्यांच्या घरातील कपाटातून २७ ग्रॅम सोन्याचे लक्ष्मी हार, गंठण, कानातील फुले, रिंगा असा एकूण ९६ हजार रुपयांचा ऐवज पळविला. सहाय्यक फौजदार थोरात तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...