आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन दिवाळीत काळाचा घाला:गोव्याकडे जाणारी मिनी बस पुलावरून 50 फुट खाली कोसळली; पाच जागीच ठार, सहा जण गंभीर जखमी

सातारा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बसमधील जखमी प्रवासी बाहेर आल्यानंतर मिळाली घटनेची माहिती

दिवाळीची धूम सुरु असताना आशियाई महामार्गावर सातारापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या पुलावरुन मिनीबस सुमारे 50 फुट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाच जण ठार झाले आहेत.

उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फुट खाली कोसळली. बसमधील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात झाल्याचे समजले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले.