आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्याची मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. पायाभूत सुविधांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सीडमनीसाठी एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक नवीन आयडिया प्रकल्पासाठी १५ लाख रुपये मिळणार आहेत. या अंतर्गत ग्रामीण भागातील नवउद्योजकांचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेज विभाग कार्यरत आहे. त्यामार्फत उद्योग मंत्रालयाकडे बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ग्रामीण भागातील युवकांमध्ये उद्यमशीलता निर्माण करण्यासाठी व उद्योजक पिढी घडवण्यासाठी विद्यापीठाला केंद्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावर मदत केली जाणार आहे. त्यातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विद्यापीठास हातभार लावण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ग्रामीण भागातील लोकांचे वेगवेगळे नवीन विचार, कल्पना विचारात घेऊन नवीन उद्योग कसा सुरू करता येईल, त्याला विद्यापीठ व शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे काम या बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या वतीने करण्यात येणार असल्याचे विभागाचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.