आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:आवडेल ती गणेश मूर्ती घ्या, देणगी मूल्य द्या अथवा मोफत न्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विविध प्रकारे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यात गणेश भक्तांच्या अनोख्या भक्तीची भर पडत आहे. काही भक्त गणेश मूर्ती वाटप करत आहेत तर काहीजण ग्राहकांच्या ऐच्छिक दरानुसार गणेश मूर्ती विकत आहेत. बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीने २०१९ पासून मोफत गणेश मूर्ती वाटप केली जात आहे. प्रत्येक वर्षी १००, १५१, २०१ एवढ्या गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा २५१ मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे. शिवानुुभव मंगल कार्यालय येथे मूर्ती वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रीशैल बनशेट्टी यांनी दिली.

महिला हॉस्पिटलच्या मागे व्यंकटेश नगर येथे मिलिंद माईनकर हे गेल्या आठ वर्षांपासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपक्रम राबवत आहेत. शाडूच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. आवडेल ती मूर्ती घ्यायची अाणि पेटीमध्ये आपल्या इच्छेनुसार रक्कम बंद मुठीने टाकायची. त्यांच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.मंद्रूपमध्ये छाेट्या आकाराच्या गणपती मूर्तींना मागणी आहे. या मूर्ती तयार करून कुंभार हे गावात आणून २०-३० रुपयांना विकतात. त्या बदल्यात नागरिक त्यांना कोणी पैसे देतात. तर कोणी धान्य देतात.

‘मूर्ती आमची किंमत तुमची’
ओम गर्जना मंदिराजवळील स्वामी विवेकानंद सोसायटीमधील अंजली गजभार या अभिनव उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या स्टॉलवर त्यांनी मूर्ती सोबत एक गल्लापेटीप्रमाणे पेटी ठेवली आहे. आवडेल ती गणेश मूर्ती घ्यायची आणि आपल्या इच्छेनुसार त्या पेटीत पैसे टाकायचे. श्रींच्या मूर्ती अमूल्य असून, त्याचे माेल लावणे योग्य नाही, अशी भावना गजभार यांची आहे. ज्यांना गणेश मूर्ती हवी आहे त्यांनी घ्यावी, असे आवाहन गजभार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...