आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्य महोत्सवास सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:कडवंची, तांदूळसा रानभाज्यांची खरेदी अन् भाजी-भाकरीचा आस्वाद

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोवळ्या भाज्या खरेदी करण्यासह गरम भाकरी अन् तयार भाजीचा आस्वाद जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांसह, सोलापूरकरांनी घेतला. निमित्त होते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी, खाद्य महोत्सवाचे.बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

महोत्सवास ग्रामीण भागातील २० पेक्षा अधिक बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत रानभाज्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर बचत गटाच्या महिलांनी त्याच परिसरात चुलीवर रानभाजी तयार करून गरमागरम भाकरी अन् थालिपीठ करून विक्री केली. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अजयसिंह पवार उपस्थित होते.

रानभाज्या घेण्यासाठी उडाली झुंबड!
कडवंची, चिगळ, राजगिरा, चंदन बटवा , राजगिरा, कडवंची, तांदूळसा, हादगा, पाथर, माठ, सराटा, घोळ, रान करडा, नाई पाला, कोळसा भाजी या गावरान भाज्या घेण्यासाठी झुंबड उडाली होती. बचत गटातील महिलांना आर्थिक लाभ झाला.

महोत्सवाची आज सांगता...
जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित रानभाजी विक्री, खाद्यपदार्थ महोत्सवाची गुरुवारी सांगता होईल. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे , असे उमेदचे समन्वयक सचिन चवरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...