आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नोकरीचे आमिष दाखवून; 5.70  लाखांची फसवणूक

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन ५ लाख ७० हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी सनाउल्ला मुजम्मिल सय्यद (वय ३२, रा. आयेशा टॉवर, तेलंगी पाच्छा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७००५०८५३०३ व ९३१९११२०२६ या माेबाइल धारकांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सय्यद यांच्या मोबाइलवर आरोपींकडून ‘जॉब पाहिजे का’, असा मेसेज आला. त्यानंतर फिर्यादीने जॉबची आवश्यकता असल्याने त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांना ऑनलाइन, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम इंस्टाग्रामवर अकाउंटधारकांचे फॉलोवर वाढविण्याचे वेबसाईटवर ट्रेंडिंग करून कमिशन मिळवण्याचे काम असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यावर पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी सय्यद यांना संशयितांच्या बँक खात्यावर पाच लाख सत्तर हजार रुपये जमा करून दिलेला जॉब पूर्ण केला.

त्यानंतर फिर्यादी सय्यद यांनी केलेल्या कामाचा मोबदला व भरलेली मुद्दल रक्कम परत मागितली असता, ती रक्कम फिर्यादींना परत न करता तुम्हाला पुढील टास्कसाठी आणखी ४ लाख ४८ हजार रुपये भरावे लागतील, नाहीतर तुम्हाला कमिशन व मुद्दल रक्कम मिळणार नाही असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...