आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवाळीते भाऊराया:चिनी राख्यांना करा बाय बाय, देशी राख्या देत आहेत जोरदार टक्कर; कुंदन-मोत्यांच्या बंधनाला महिलांची पसंती

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी देशात तयार होणाऱ्या राखीला देशी राख्या टक्कर देत आहेत. सोलापूरच्या बाजारपेठेत चिनी राख्यांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याउलट बचत गटाच्या, विशेष मुलांकडून तयार करण्यात आलेल्या राख्या व घरगुती तयार केल्या जाणाऱ्या राख्या आणि जवळपासच्या शहरांमधील गटांनी बनवलेल्या राख्या यांना सध्या जोरदार मागणी आहे. तर मुंबईच्या बाजारपेठेतून येणाऱ्या कार्टूनच्या राख्यांना देखील मोठी मागणी सध्या सोलापुरात होत आहे. त्यामुळे चिनी राख्यांना बाय बाय करण्याची वेळ आली आहे.

सोलापुरात अनेक बचत गटांकडून राख्या तयार होत आहेत तर काही हौशी महिला काही शाळा आणि काही व्यावसायिक महिला मंडळी या राख्या तयार करण्याचे काम करत आहेत. यांच्या किंमती कमी असून चीनी राख्यांच्या तुलनेने या राख्या देशी आकाराच्या देशी रंगाच्या आणि रेशमी धाग्यांच्या आहेत. त्यामुळे याला जास्त पसंती मिळत आहे.

राख्यांचे प्रकार

तिरंगा, रुद्र, कुंदन, मोती ,रेशमी, गोंड्याच्या, गणपती, सुपारी, मणी, आभा, नागमणी, नवरंगी राखी अशा असंख्य प्रकारच्या देशी राख्यांचे प्रकार सध्या सोलापुरात पाहायला मिळत आहेत. शिवाय यांचे दर पाच रुपयापासून शंभर रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे चांदीच्या राख्यांचेही भरपूर प्रकार सोनाराच्या व्यापाऱ्यांकडे आलेले आहेत.

युवतीने तयार केली बॉक्स संकल्पना

रिद्धी मेंढापुरे या युवतीने आपल्या कल्पकतेने एक बॉक्समध्ये चॉकलेट हळदी कुंकू अक्षता राखी असा सेट तयार केला आहे. जो आपण प्रवासात आरामात नेऊ शकतो. शिवाय त्यात असलेल्या सर्व गोष्टींमुळे कुठेही सहज रक्षाबंधन साजरा करू शकतो. याला महिला, युवतींची अधिक पसंती मिळत आहे.

रक्षाबंधन आनंदाने साजरे करा- दाते

गुरुवारी (दि. 11) रक्षाबंधन आहे. त्या दिवशी भद्रा आहे. पण, त्याचे कोणतेही बंधन रक्षाबंधनास नाही. असे पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले. दाते म्हणाले, पूर्वी रक्षाबंधनादिवशी राजे, महाराजा होम करायचे. त्या होमातील पवित्र राख (रक्षासुत्र) बांधत. त्या होमासाठी भद्राचे महत्व होते. अलीकडच्या काळामध्ये रक्षाबंधनास होमहवन विधी सहसा होत नाही. रक्षाबंधनास भद्राचे कोणतेही बंधन नाही, त्यामुळे रक्षाबंधन सोहळा आनंदाने साजरा करावा, असेही दाते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...