आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट कार्य:सहकारमहर्षी साहित्य पुरस्कारासाठी आवाहन ; महर्षीं जयंती दिवशी पुरस्काराचे होणार वितरण

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव पब्लिक ट्रस्टच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी राज्यातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती ट्रस्टकडे पाठवावेत, असे आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व निवड समितीच्या अध्यक्ष स्वरूपाराणी मोहिते - पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. १४ जानेवारीला सहकार महर्षींच्या जयंती दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

स्वरुपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे अनेक साहित्यिक, विचारवंत व वक्ते यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कार्याची ही परंपरा माजी उपमुख्यमंत्री तथा श्री विजय गणेशोत्सव पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष विजयसिंह मोहितेयांनी सुरू ठेवली. यावेळी श्री. विजयसिंह मोहिते, संचालक नंदिनीदेवी मोहिते, सचिव अभयसिंह माने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...