आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुतीन यांना बुद्ध शिल्प पाठवत शांततेचे आवाहन

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाकारुणिक प्रोडक्शनचे गजधाने, डॉ. मस्के, कसबे, भालेदार, आबुटे यांची माहिती

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चाललेल्या युध्दाची संपूर्ण जगाला झळ बसत आहे. कदाचित याची परिणिती भीषण अशा तिसऱ्या महायुद्धात होते की काय? अशी शंका जगाला भेडसावत आहे. याचीच दखल घेत विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या भारताच्या धरतीवरून युद्ध थांबवावे. असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना देण्यात आला आहे. तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट म्हणून पाठवली आहे, अशी माहिती येथील महाकारुणिक प्रोडक्शनने पत्रकारांना दिली.

युध्दाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत, असे बुद्धांनी सांगितले आहे. कोणताच धर्म युद्धाला पाठिंबा देत नाही. अगदी येशू ख्रिस्ताने सुध्दा सर्वांशी, इतकेटच काय शत्रूशी सुध्दा प्रेमाने वागण्यास सांगितले आहे, असे प्रोडक्शनचे रवी गजधाने, सृष्टी कसबे, पवन भालेदार, डाॅ. औदुंबर मस्के, स्मिती आबुटे यांनी सांगितले.

दुभंगलेल्या पृथ्वीला सुई-दोऱ्याने शिवताना
डॉ. औदुंबर मस्के यांच्या संकल्पनेतून स्मिता आबुटे यांनी दुभंगलेल्या पृथ्वीला सुई-दोऱ्याने शिवताना गाैतम बुद्ध ही मूर्ती तयार केली आहे. त्यांच्या मांडीवर युध्दात जखमी झालेले बाळ विश्रांती घेत आहे. विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुध्द, ज्यांनी युध्दा टाळण्यासाठी राजपदाचा त्याग केला. अशा या भूमीतून भारत देशातून आम्ही युध्द टाळण्यासाठी आवाहन करीत आहोत. रशियाने युद्ध थांबवावे, असा संदेश रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना महाकारुणिक प्रोडक्शनने

पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...