आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 कनिष्ठ महाविद्यालयांचे कॅम्पस बहरले:शालेय दिवस संपले, महाविद्यालयात आले पहिल्या दिवशी 9 हजार विद्यार्थी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात तब्बल नऊ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शालेय दिवस संपवून काॅलेज जीवनाचा अनुभव गुरुवारी घेतला. शहरातील 64 महाविद्यालयात अकरावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे काॅलेजचे कॅम्स विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीने बहरले होते.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर वर्गाचा पहिला दिवस गुरुवारी नवीन कॅम्पस, नवे विद्यार्थी-विद्यार्थींनीची ओळख करून घेत मजेतच गेला. प्राचार्य व शिक्षकांनी महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. कॉलेजमध्ये शिस्त पालन आवश्यक असल्याचे सांगितले.

दहावी परीक्षेचा निकालास विलंब लागल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेलाही उशीर झाला. त्यामुळे प्रत्यक्षात क्लास सुरू होण्यासही विलंब झाला. शहरातील 64 महाविद्यालयातील अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञानाचे विद्यार्थी उपस्थित होते. शहरात अकरावीसाठी 15 हजाराहून अधिक प्रवेश क्षमता आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी 60 ते 70 टक्के विद्यार्थी वर्गात हजर होते. शिक्षक व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यात सुमारे 55 हजार विद्यार्थी

जिल्ह्यातील एकुण 404 कनिष्ठ महाविद्यालये असून त्यामध्ये 55 हजार प्रवेश क्षमता आहे. एकुण कनिष्ठ महाविद्यालये अनुदानित 268, त्यामध्ये 18 महाविद्यालये सोशल वेलफेअर, 24 खासगी विना अनुदानित, 14 अंशता अनुदानित, 77 स्वयं अर्थसाहाय्यित, केंद्रीय 1, नवोदय 1 व नगरपरिषदचे 1 अशी कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

नियमित वर्ग होणार

अकरावीचे वर्ग सुरू झालेले असून नियमित तासिका सुरु झाल्या आहेत. उपस्थितीही छान आहे. विद्यार्थीही महाविद्यालये सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होते. प्रत्यक्षात शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद असल्याशिवाय अध्ययन व अध्यापन होत नाही. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नियम, विविध उपक्रम व शिस्त-वाहतुकीचे नियम याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.’’ - प्रा. प्रसाद कुंटे, उपप्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय

अकरावीचे विद्यार्थी म्हणाले ...

''मी सेवासदन ची विद्यार्थीनी आहे. अकरावीचा पहिला दिवस छान व मजेत गेला. सर्व शिक्षक छान मार्गदर्शन करत होते. पहिल्याच दिवशी महाविद्यालयात सर्व तास झालेत. महाविद्यालयाचे कॅम्पस छान आहे.''- जानव्ही राक्षे

''संगमेश्वर महाविद्यालयाचे नाव मोठं आहे हे ऐकून होते. पण प्रत्यक्षात महाविद्यालयात आल्यानंतर त्याचा प्रत्यक्षात अनुभव ही पहिल्याच दिवसी घेतला. शिक्षकही आपुलकीने वागवत असल्याचे जाणवून आले.''-आरती ओव्हळ

बातम्या आणखी आहेत...