आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिका दिन:कॅण्डल लॅम्प व प्रार्थना, सत्काराने परिचारिकांचा गौरव; टॉवेल सिटी राऊंड टेबल 150 व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून उपक्रम

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचारिका अंजू काकडे यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ अरुंधती हराळकर, राष्ट्रीय आरोग्याचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अतिश बोराडे आदींच्या यांच्या हस्ते दीप दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व नर्सेस यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्रजनन व माता बाल संगोपन कार्यालय, डफरिन प्रसूती गृह, मदर तेरेसा पॉलिक्लिनिक, विडी घरकुल, शेळगी, मुद्रा सनसिटी, जोडभावी, बाळे, जिजामाता, नई जिंदगी, रामवाडी, सोरेगांव, साबळे, सिव्हिल, भावनाऋषी या नागरिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या व कोरोनच्या काळामध्ये काम केलेल्या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा तलफदार, संगीता गुरव यांनी केले. आभार अनिता आकाशी यांनी मानले. यावेळी डॉ. सुहासिनी वाळवेकर, डॉ. मंजूषा चाफळकर, डॉ.तवनगी जोग, डॉ. स्वरांजली पवार,डॉ. लता रणखांबे, डॉ. संस्कृती वळसंगकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून विविध गुणदर्शन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गुरुवारी सकाळी कॅण्डल लॅम्प व प्रार्थना घेण्यात आली. ६ ते १२ मे दरम्यान विविध कला,क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या अनेक परिचारिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यामध्ये विमल पवार, रेणुका कुलकर्णी, स्मिता माळवदकर, राणी सुत्रावे (बागल) आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...