आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दादपुरात उसात लावलेला 9 लाख रुपयांचा गांजा जप्त

मोहोळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसाच्या पिकात मोहोळ तालुक्यातील दादपूर शिवारात एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची माहिती कामती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी छापा टाकला असता शेतात लहान मोठी ७५ गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचा गाजा जप्त केला. याप्रकरणी बाजीराव लोभा राठोड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लामाणतांडा कामती खुर्द येथील बाजीराव लोभा राठोड याची दादपूर गावच्या शिवारात शेती आहे त्यामध्ये उसाचे क्षेत्र आहे. उसामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारला दादपूर शिवारातील बाजीराव राठोड यांच्या ऊसाच्या पिकात छापा टाकला. तिथे ७५ गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी कारवाई करत ९०.७९० किलो ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत ९ लाख ७ हजार ९०० रुपये आहे. याबाबतची कामती पोलिसात फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल युवराज कासवीद यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...