आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:देवदर्शानाहून परतताना वाटेतच टायर फुटला; कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

अक्कलकोट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील गाणगापूर येथून देवदर्शन करुन अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत झालेले सर्वजण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास अफझलपुर तालुक्यातील बळोरगीजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील हे भाविक कुटुंबियांसोबत अक्कलकोट येथे श्री. स्वामी समर्थ यांच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर हे सर्व भाविक पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूरल येथे गेले होते. त्याठिकाणाहून दर्शन आटोपून ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते. तेव्हा वाटेतच बळोरगीजवळ अचानक कारचे टायर फुटले. त्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...