आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च:कार, बस, टॅक्सी, रुग्णवाहिकेत आता येणार स्वयंचलित सॅनिटायझिंग, इटलीत नोकरी करणाऱ्या सोलापूरच्या ऋत्विज मुनोळीचे संशोधन

सोलापूर / अजित बिराजदार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनासह सर्वच आजारांच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सॅनिटायझिंगला आता विशेष महत्त्व आले आहे. मार्च-२०२० पासून जगभरात सॅनिटायझिंगचा आग्रह धरला जात आहे. ही गरज ओळखून सोलापूरचे युवा अभियंता ऋत्विज मुनोळी यांनी इटलीमध्ये लोकोपयोगी संशोधन केले आहे. त्यांनी सार्वजनिक वाहतुकीतील बस, रुग्णवाहिकेसह खासगी कारमध्ये स्वयंचलित सॅनिटायझिंग मशिनचे ‘प्रोटोटाइप’ तयार केले आहेत. इटलीतील कंपन्यांनी तर हे यंत्र ‘इनबिल्ट’ बसवण्याची तयारी सुरू केली आहे.

सोलापुरातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून ऋत्विज यांनी बी. ई. मेकॅनिकल केले आहे. त्यानंतर इटलीतील विद्यापीठातून विशेष प्रावीण्यासह एम. ई. केले. इटलीतीलच सीएफ कंपनीत ते कार्यरत आहेत. कार निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणारी ही कंपनी आहे. नोकरी लागली पण ऋत्विज यांचा संशोधनाचा पिंड कायम होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीए हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मॅन्युअली सॅनिटायझेशन कधीपर्यंत करायचे..? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी स्वयंचलित सॅनिटायझिंग यंत्र विकसित केले आहे. ‘ऑटोमोटिव्ह इलेक्ट्राॅनिक डिव्हाइस सॅनिलायनर’ असे संंशोधन प्रकल्पाचे नाव आहे. सार्वजनिक वाहन अर्थात बस, रुग्णवाहिका, ट्रॅव्हल्स एजन्सीची टॅक्सी एवढेच नव्हे तर खासगी कारमध्येही अशी यंत्रणा बसविणे आता शक्य आहे. त्यांनी ‘प्रोटोटाईप’साठी सलग १३ महिने परिश्रम घेतले आहे. तयार ‘प्रोटोटाईप’ स्पर्धेत मांडले तर त्यांचे युरोपात खुपच कौतुक झाले. ‘युरोपियन प्रादेशिक विकास निधी’ या संस्थेमार्फत त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले. या यंत्राचे सर्व प्रयोग यशस्वी झाले आहेत. ‘प्रोटोटाईप’चे रूपांतर व्यावसायिक उत्पादनात करण्यात येणार आहे.

वातानुकूलित यंत्राद्वारेच होईल सॅनिटायझिंग
1.
प्रत्येक वाहनांत वातानुकूलित यंत्र असते. त्याच यंत्राद्वारे स्वयंचलित पद्धतीने वाहनांच्या आतील भाग आपोआप सॅनिटाइझ होत राहील. हे यंत्र वाहन निर्मिती वेळी ‘इनबिल्ट’ बसवले तर कमी खर्चात ग्राहकांना एक नवे फीचर उपलब्ध होईल. ठरावीक वेळेनंतर आतून वाहन सॅनिटाइज होत राहणार आहे.
2. सॅनिटायझिंक लिक्विड यासाठी वापरण्यात येते. सॅनिटायझरचे इंजेक्टर एका छोट्या मोटरद्वारे कार्यरत राहते. हे यंत्र ऑटोमोटिव्ह किंवा मॅन्युअली ऑपरेट होते.
98.67% अचूकता ‘प्रोटोटाईप’ने सिद्ध. ईआरडीएफने स्वीकारले आहे. युरोपीय वाहन कंपन्यांचा संशोधन वापरण्यासाठी होकार.
3. मशीनचा सायंटिफिक रिपोर्ट कंपनीनेच ऋत्विजच्या वतीने सादर केला होता. संशोधनाचे ‘व्हॅलिडेशन आणि सर्टिफिकेशन’ लवकरच मिळणार आहे. त्यानंतर युरोपियन कंपन्या सार्वजनिक वाहतुकीत वापर करणार आहेत. दिल्लीतील या कंपनीच्या शाखेमार्फत भारतीयांनाही याचा लाभ मिळू शकेल.

संशोधनासाठी मिळाली तब्बल ८४ लाख रुपयांची रक्कम
सीएफ कंपनीत रुजू झाल्यानंतर मला मोठा प्रकल्प मिळाला होता. जगातील सर्वश्रेष्ठ मॅन्युफॅक्चर कंपनी लॅम्बोर्गिनीकडून या कंपनीच्या अॅवेंटाडोर या मॉडेलमधील आसन व्यवस्थेचे आर्किटेक्चर डिझाइन मी केले आहे. या प्रकल्पात यश आल्यामुळे नव्या संशोधनाची जबाबदारी मिळाली. दीड लाख युरो म्हणजे ८४ लाख ९ हजार ३९५ रुपयांचा फंड या संशोधनासाठी मंजूर झाला. कंपनीचे सीईओ फ्लाविओ कोराडीनी, सॉफ्टवेअर डेव्हलपर मार्को फोरोनी आणि जर्मनीमधील प्राचार्य डॉ. मयरोंके यांनी मार्गदर्शन केले. -ऋत्विज मुनोळी, अभियंता

बातम्या आणखी आहेत...