आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी:जुनोनी अपघातातील कारचालकाला कोठडी

सांगोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माऊली विठ्ठल भक्ती मंडळ जठारवाडी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील पायी दिंडीत कार घुसल्याने सोमवारी रात्री सात वारकरी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी कारचालक दिग्विजय मानसिंग सरदार (रा. माळी वस्ती, टाकळी रोड पंढरपूर) व इतर एका सहआरोपीस ४ नोव्हेंबरपर्यंत सांगोला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

जठारवाडी येथील दिंडी कार्तिक यात्रेसाठी पंढरपूरला निघाली होती. या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकि एकाची प्रकृती चिंताजनक असून, चार जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जठारवाडीचे सरपंच नंदकुमार खाडे यांनी दिली. सर्व मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जठारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जखमीपैकी अनिता सर्जेराव जाधव यांच्यावर बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे. काटे आणि जगदाळे यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...