आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीचा ताबा सोडण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी प्रकाश वानकार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उत्तम दिगंबर नवघरे, वय ५४, रा. आदर्श नगर, एमआयडीसी यांनी फिर्याद दिली होती. नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानकर यांनी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे बोलावून घेतले. नवघरे हे ऋषीकेश मनलोर आणि सुजित कोकरे यांच्यासोबत गेले होते. वानकर यांनी नवघरे यांना व्हीआयपी रूममध्ये एकट्याला बोलावले. दरवाजा बंद केला.
तिऱ्हट गावची जमीन मी माझ्या माणसाला खरेदी करायला लावली आहे. तू ताबा सोड. हा रिव्हॉल्वर बघितला का, असे म्हणत धमकावले. नवघरे हे शब्दाला शब्द देत होते. हातवारे करून बोलताना वानकर यांनी हात पकडून ढकलून दिले. त्यात नवघरे खाली पडले. त्यानंतर वानकर यांनी पाठीवर बुटाने लाथा मारून जखमी केले, असे नवघरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
वादाची ती जागा नेमकी कोणाची, ती जागा किती आहे, वाद कशासाठी होता, जागेचा सौदा कोणासोबत झाला होता? तसेच, शासकीय विश्रामगृह येथील रूम कोणाच्या नावाने बुक होते, ज्यांच्या नावाने रूम बुक केले होते त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अर्ज केले होते का, प्रशासनाने अर्जास मंजुरी दिली होती का, शासकीय विश्रामगृह येथील सीसीटीव्ही फुटेज या सर्व मुद्द्यांची तपासणी आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.