आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर जिल्ह्यात अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करणाऱ्या 15 मद्यपी व 2 हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील या प्रकरणी गुन्हेगारांना न्यायालयाने 68 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप,संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे यांचे आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या बातमीच्या आधारे निरीक्षक अ विभाग यांनी विजापूर रोडवरील परिसरातील जलसा ढाबा येथे छापा टाकला होता.
सदर हॉटेलचे चालक यांचेसह त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या 7 मद्यपी नामे किशोर भूमकर, रोहीत पतंगे, विनायक चव्हाण,विनायक होटकर,स्वप्नील गायकवाड ,दर्शन चव्हाण,कांतेप्पा चव्हाण व ढाबाचालक मंगेश होटकर यांस अटक करुन ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून रू. 945/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 10 नोव्हेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.
नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालक यास रू. 25,000/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. 2000/- प्रमाणे असा एकूण 39,000/- दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद एस.ए. बिराजदार यांनी दिली असुन तपास निरिक्षक संभाजी फडतरे यांनी पूर्ण केला.
तर दुसरीकडे त्याचदिवशी निरीक्षक माळशिरस विभाग यांनी मंगळवेढा येथील मराठवाडा ढाबा येथे छापा टाकला असता सदर हॉटेलचे चालक यांचेसह त्याच्या हॉटेलमध्ये अवैध रित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या 8 मद्यपी नामे संजय जाधव, सचिन उन्हाळे, उत्तम भुसे, शंकर आसबे, योगेश फराटे,कानीफनाथ लोखंडे,लखन मंडलिक,गणेश मोरे व ढाबाचालक श्रीकांत लेंडवे यांस अटक करुन ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून रू. 1900/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले मा. न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,मंगळवेढा यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालक यास रू. 25,000/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. 500/- प्रमाणे असा एकूण 29,000/- दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद रवी पवार यांनी दिली असुन तपास निरिक्षक संदीप कदम यांनी पूर्ण केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.