आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आंतरजातीय विवाहानंतर जात समजली, विवाहितेचा छळ

सोलापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर सासरच्या मंडळींना मुलीची जात समजली आणि तेव्हापासून तिचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, अशी फिर्याद विवाहितेने सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साेनल अतुल बेलखिरे (वय २७, रा. महात्मा फुले झोपडपट्टी मोदी) यांचा अतुल सोबत १५ फेब्रुवारी २०२१ रोजी देहू आळंदी येथे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले. हे लग्न आंतरजातीय प्रेमविवाह होते. लग्नानंतर सोनल या सासरी आल्या. काही दिवसांनंतर लग्न जमवणारे मध्यस्थी कल्पना वेनूर यांनी सासरी येऊन सोनलच्या जातीबद्दल सांगितले. तेव्हापासून विवाहितेला हलक्या जातीची असल्याचे वारंवार सांगून स्वयंपाक घरात येऊ देत नव्हते. घरातील बाथरूम वापरण्यास नकार देऊन वॉचमनची बाथरूम वापरण्यास भाग पाडत होते. लग्नात मानपान नाही, सोने दिले नाही. हलक्या जातीची आहे, असे सांगून त्रास दिला, अशी फिर्याद सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केला. अतुल बेलखिरे, वंदिता बेलखिरे, मोतीचंद बेलखिरे, राहुल बेलखिरे (रा. कात्रज पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...