आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव कमिटीतर्फे पाळणा सोहळा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्म उत्सव कमिटी बाळे यांच्या वतीने शुक्रवार, दि. १३ मे रोजी पाळणा सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा छत्रपती संभाजीराजे चौक, जुना पुना नाका येथे आयोजिला आहे, अशी माहिती कृष्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमस्थळी ठीक ११.४५ मिनिटांनी सर्व उपस्थित महिलांच्या आवाजात एक सुरात छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा पार पाडेल. शंभुराजे यांच्यावरील अंगाईगीत निवडक महिला सादर करतील. दुपारी बारा वाजता गुलाल व पुष्पवृष्टी करून संभाजी महाराजांना अभिवादन होईल. शहर परिसरातील महिला व शिवशंभूप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...