आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसऱ्या दिवशी सीईओ दिलीप स्वामींचा कारवाईचा धडाका:दोन ग्रामसेवक निलंबित, तर एका ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखली

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी दोन ग्रामसेवकांना निलंबित व एकाची ग्राम वेतन वाढ रोखण्याची कारवाई केली. बुधवारी सीईओ स्वामी यांनी तीन शिक्षकांवर कारवाई केली होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तीन ग्रामसेवकांवर ही कारवाई केली आहे.

रत्नाकर रोहीदास अभिवंत ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मौजे जाधववाडी (मों) ता. माढा येथे कार्यरत असताना ग्रामपंचायतीचे सजेमध्ये गैरहजर राहणे. ग्रामपंचायतीचे कामकाजामध्ये अनियमितता करणे. कर्तव्यात कसुर करणे. अर्थिक अनियमितता करणे याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती कुर्डुवाडी यांचेकडील अहवालानुसार अभिवंत यांना निलंबित करण्यात आले आहे.

पांडुरंग महादेव एकतपुरे हे ग्रामसेवक या पदावर ग्रामपंचायत माळेवाडी बोरगाव ता. माळशिरस येथे कार्यरत असताना. ग्रामसेवक या पदाचे कर्तव्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणे. वरिष्ठांचे आदेशाचा अवमान करणे. गैरशिस्तीचे वर्तन करणे. कर्तव्यात कसुरी करणे, सरकारी नोकर असूनही प्रशासनास सहकार्य न करणे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती न्यायालयामध्ये देणे. अभियोग पक्षाचे खटल्यास अनुसरुन साक्ष न देणे याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केलेने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील त) नियम 1964 मधील नियम 4 मधील उपनियम (2) नुसार एकतपुरे ग्रामसेवक यांची एक वेतनवाढ तात्पुरते स्वरुपात बंद करणेची शास्ती करणेत आलेली आहे.

एन.जी. जोडमोटे ग्रामसेवक हे पंचायत समिती द. सोलापूर अंतर्गतत ग्रामपंचायत बोरामणी येथे दिनांक 28/06/2017 ते दिनांक 27/10/2021 या कालावधीत कार्यरत असताना ग्रामपंचायतीचे सचिव म्हणुन ग्रामसेवक या पदाची कर्तव्य व जबाबदारी पार पाडणेबाबत अक्षम्य दुर्लक्ष करणे ग्रामपंचायत बोरामणी येथुन अन्य सजेमध्ये बदली झाली असता येथील ग्रामपंचायतीचा संपूर्ण पदभार हस्तांतरीत न करणे. ग्रामपंचायतीचे अभिलेखे दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे, ग्रामपंचायतीचे विकास कामे करताना विविध योजना व प्राप्त निधी खर्च करता अधिक अनियमितता व अपहार करणे, ग्रामपंचायतीला प्राप्त 14 वा वित्त आयोग निधी खर्च करताना विहीत कार्यपध्दतीचा अवलंब न करणे. सदर निधी खर्च करताना अर्थिक अनियमितता व अपहार करणे. ग्रामपंचायतीचे सचिव या पदाचे कर्तव्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणे. आदी दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...