आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन सोहळा रविवारी (दि. ३) हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. शनिवारी गुढीपाडवा व रविवारी साप्ताहिक सुटी या सलग सुट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीने भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्याची सोय केली होती. तसेच कोरोनामुळे दोन वर्षांनंतर स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याचे या जन्मी साक्षीदार होता आल्याने अनेक भक्तांच्या नयनात आनंदाश्रू तरळले.
पहाटे पाच वाजता पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते श्रींची काकड आरती झाली. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांची उपस्थिती होती. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात विश्वस्त उज्ज्वला सरदेशमुख व सहकाऱ्यांच्या सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन झाले. त्यानंतर गुलाल, पुष्प वाहून पाळणा सोहळा झाला. अध्यक्ष इंगळे यांच्या हस्ते आरती झाली. मोहन पुजारी, मंदार पुजारी उपस्थित होते. नैवेद्य आरतीनंतर देवस्थानने भाविकांना प्रसाद वाटप केले. माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले यांच्यासह कुटुंबीय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, परिवेक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक आश्विन कार्तिक, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे कपिल पाटील, अहमदनगरचे जीवन कटारिया, पुण्याचे प्रथमेश देशमुख यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
सुमधुर शास्त्रीय संगीताने भाविकांचा आनंद द्विगुणित
भाविकांच्या संकल्पित अन्नदानानातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील भक्त निवासात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. दुपारी १२ ते एक, चार ते सायंकाळी सहा या वेळेत सोलापूरचे भीमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन, व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी रसिका व सानिका कुलकर्णी यांचे भक्तिसंगीत सेवा झाली. सुमधुर शास्त्रीय राग गायनाने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. देवस्थानच्या शिबिरात १२८ जणांनी रक्तदान केले.
माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले यांच्यासह कुटुंबीय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, परिवेक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक आश्विन कार्तिक, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे कपिल पाटील, अहमदनगरचे जीवन कटारिया, पुण्याचे प्रथमेश देशमुख यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
भाविकांना दर्शनासह विविध कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्ज्वला सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली आदींनी परिश्रम घेतले.
५० हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अन्नपूर्णा माता की जयच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सुमारे ५० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली, जम्मू काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेशसह विदेशातील भाविकांचा यात समावेश होता. दरम्यान, मंडळात भाविकांच्या उपस्थितीत पुरोहित अप्पू पुजारी यांनी विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम केले. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसादाचे नियोजन केले होते. भाविकांनी मंडळाच्या परिसराती श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह, महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, यात्री निवास, यात्रीभुवन, अतिथीगृह, आऊटडोअर व इनडोअर जिम, वाहनतळ, श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शनी, अग्निशमन, रुग्णवाहिकास विविध उपक्रम पाहून न्यासाचे कौतुक केले. या वेळी उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, अप्पा नवले, प्रशांत शिंदे, शहाजी यादव, सागर याळवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.