आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा शनिवार:निषेधार्थ जोडे मारले, पुतळा जाळला; वादग्रस्त वक्तव्यांचे उमटले पडसाद

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शनिवारी शहरात आंदोलने करण्यात आली. मंत्री पाटील यांचा भांग विस्कटणाऱ्यास दोन लाख एक रुपयांचे बक्षीस भीमसैनिकांनी जाहीर केले तर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या संदर्भात शुक्रवार केलेले वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद शनिवारी (दि. १०) सकाळपासून शहर व जिल्ह्यात उमटले.कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिमेला काळे फासलेशनिवारी दुपारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याज‌वळ कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगाव, सांगली, सोलापूर सक्रिय सहभागी होता. महाराष्ट्र एकसंघ असून देशाला ऊर्जा देणारे राष्ट्र असून कर्नाटकच्या धमक्यांना बळी पडणार नाही.

सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहरावर कर्नाटकचा डोळा असून त्यांचे स्वप्न कधीच सोलापूरकर यशस्वी होऊ देणार नाहीत. कर्नाटकने महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांच्याकडील एकही वाहन सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिला. या प्रसंगी मनोज शेजवाल, दिलीप कोल्हे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने केले जोडो मारो आंदोलन
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर मंत्री पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यास त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा याप्रसंगी शहर पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी दिला. या आंदोलनात शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, जुबेर बागवान, किसन जाधव, प्रमोद भोसले, बसवराज कोळी, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, नलिनी चंदेले, सायरा शेख, वंदना भिसे, नीला खांडेकर, नसीमा शेतसंदी, चित्रा कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप कार्यालयासमोर युवा भीमसेनेने जाळला पुतळा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १०) युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिल चौक परिसरातील भाजपच्या कार्यालयासमोर पुतळा जाळला. तसेच, मंत्री पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत राजीनामा देण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे, विकास गायकवाड, हुसेन बागवान, सुनील काळे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डोलारे म्हणाले, “महामानवाबद्दल बदनामीकारक वक्तव्ये न थांबल्यास भाजपच्या नेत्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला.

पाटलांचा भांग विस्कटेल त्याला दोन लाखांंचे बक्षीस
भीमसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चा काढला. पण, पोलिसांनी हस्तक्षेप करीत मेकॅनिकी चौकात तिरडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या केसांचा भांग विस्कटणाऱ्यास दोन लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा कांत उघडे यांनी केली. याप्रसंगी अतिष बनसोडे, सोहन लोंढे, रत्नदीप भोसले, शांतिसागर सरवदे, आनंद भालेराव, मंटी बाबरे, संदीप सुरवसे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...