आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Chandrapurat Pakshimitra Samelan, B.S. Pakshimitra Lifetime Achievement Award To Kulkarni; Mindfulness Will Reach The Forest From The Heart, Testimony Of Mungantivar

चंद्रपुरात पक्षीमित्र संमेलन:बी.एस. कुलकर्णी यांना पक्षिमित्र जीवनगौरव पुरस्कार; चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, मुनगंटीवारांची ग्वाही

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित ३५ व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष आणि दीप प्रज्वलन करून उदघाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी श्री. मुरुगानंथन, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शहा, इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.

यावेळी वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विविध पक्षांची चित्रे बघून मन प्रफुल्लीत होते. पक्ष्याचा आवाज मनाला आनंद देतो. पक्षी सृष्टीतील देणगी आहे. देशात 2000 पासून 2022 पर्यंत पर्यावरण समतोल बिघडल्याने पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पर्यावरण आरोग्य ठीक नसेल तर पक्षी जगणार नाही. त्यासाठी चिंतन करून संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्रास पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. महाराष्टाव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी केली

स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पक्ष्याचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा यासाठी जनतेच्या सहभागातून, पक्षीमित्रांच्या अभ्यासातून आणि प्रशासनाचा सहकार्यातून प्रयत्न झाले पाहिजे . चंद्रपुरात वाघांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होते. आता चंद्रपूर बर्ड कॅपिटल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संमेलन अध्यक्ष राजकमल जोब म्हणाले, बहूतेक पक्षीमित्रांचे पक्षी निरीक्षण जलाशयांवरील पाणपक्षी गणने पासून सुरु झालेले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांवर येणा-या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना हा उपक्रम आजदेखील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडे नवीन पक्षी निरीक्षकांना आकृष्ट करु शकतो.

महाराष्ट्र पक्षीमित्र आणि होप संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पक्षीमित्र पुरस्कार 2022 वितरण करण्यात आले. यात जीवनगौरव पुरस्कार सोलापूरचे बी एस कुलकर्णी, पक्षीमित्र व संशोधन पुरस्कार प्रा. डॉ. जयवर्धन बालखंडे, श्रुशूषा पुरस्कार सोलापुरातील राजकुमार कोळी, पक्षी जनजागृती पुरस्कार अनंत पाटील, उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार अमृता आघाव, यशश्री उपरीकर यांना देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...