आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरातील राजकीय समीकरणे बदलणार:कल्याण काळे एकनाथ शिंदेंच्या सेनेत दाखल होणार का? तानाजी सावंतांची घेतली भेट

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूरच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता पंढरपूरचे कल्याण काळे एकनाथ शिंदेंच्या सेनेत दाखल होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंत्री सावंत नुकतेच सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन विचारपूस केली होती. पंढरपुरात काळे यांच्या किल्ल्यावर गेल्यानंतर मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या. काळे हे मुळचे काँग्रेसचे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. परंतु कारखान्याला शासकीय भाग भांडवल मिळवून देण्यात तांत्रिक अडचणी आल्याने ते अलिप्त राहिले होते. त्यानंतर तानाजी सावंत यांच्या संपर्कात आल्याने राजकीय वर्तुळात काळे चर्चेचा विषय बनले आहेत.

अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर

पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक, समाधान अवताडे अशी मंडळी भाजपमध्ये आहेत. अजित पवार यांचे समर्थक अभिजीत पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काळे यांनाही शिंदे गटात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

शासकीय भाग भांडवलाचे आमंत्रण

शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला शंभर कोटींचे भाग भांडवल मिळवून देतो म्हणून फडणवीस यांनी भाजपा प्रवेशाचे निमंत्रण दिले होते त्यासोबतच धनंजय महाडिक यांच्या कारखान्याला देखील शासकीय भाग भांडवलाचे आमंत्रण होते. फडणवीस यांनी काळे यांच्या कारखान्यासाठी शंभर कोटींचे कर्ज मंजूरही केले होते. परंतु त्यातील अटी पाहता हे कर्ज घेणे अवघड असल्याचे मत काळे आणि व्यक्त केले होते.

शिंदे सेनेच्या गळ्याला

महाडिक आणि मात्र विनाशर्त भाजपामध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काळे पुन्हा एकदा पक्ष बदल त्यावरून चर्चेत आलेले आहेत. काळे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या एकूण कामाची दखल घेऊनच भाजपाने त्यांच्याशी जवळीकता साधली होती. परंतु काळे त्यांच्या गळ्याला लागले नाहीत. आता शिंदे सेनेच्या गळ्याला लागण्याची शक्यता दिसून येते. तसेच झाल्यास पंढरपुरातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

बेहिशोबी मालमत्ता

पंढरपूरचे राजकारण आता साखर कारखानदारीभोवती फिरत आहे. अभिजीत पाटील यांनी कारखाने घेऊन चालवले. वाळू उत्खनन ते साखर कारखानदारी असा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या उद्योग समूहावर गेल्या महिन्यातील 25 ऑगस्ट रोजी प्राप्तिकर खात्याने छापे टाकले होते. त्यात बेहिशोबी मालमत्ता मिळाल्याची माहिती आयकर विभागाने नुकतीच दिली.

आयकर अधिकाऱ्यांचा तपास झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सोलापुरात होते. त्यांनी अभिजीत पाटील यांचे समर्थन करून त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. त्यानंतरचे पाटील भाजपमध्ये जातील असे संकेत मिळाले. या पार्श्वभूमीवर देखील कल्याण काळे यांच्या राजकीय भवितव्याकडे पाहिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...