आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल:65 एकरमध्ये केवळ दिंडी-पालखीच्या वाहनांसाठी जागा राखीव

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी यात्रा शुक्रवारी नोव्हेंबरला आहे. त्या निमित्ताने पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल आज (दि.1 नोव्हेंबर) ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत राहणार आहे, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना

पंढरपूरात यात्रे निमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्यादेवी चौक) शेटफळ चौक मार्ग विसावा येथे पार्क करावीत.

  • 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत.
  • पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस व इसबावी मैदानात पार्क करावीत.
  • कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कूल व वेअर हाउस येथे पार्क करावीत.
  • विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळीमार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व बिडारी बंगला येथे पार्कींग करावीत.

यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल, सखुबाई पार्कींग तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.

पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना

पंढरपूर शहरातून टेंभुर्णी,नगर,सोलापूर,लातूरकडे जाणाऱ्या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका,कॉलेज क्रॉस रोड,करकंब चौक मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तरविजापूर,कराड,आटपाडी,कोल्हापूर,सांगली,मिरज,मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपासमार्गे जातील.

एक ते आठ नोव्हेंबर पर्यंत पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्ग ,महाव्दार चौक ते शिवाजी चौक,सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील.

नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, काळा मारुती चौक हा मार्ग वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...