आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:केमिकल ट्रक आणि मालवाहतुक कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक, दोन्ही गाड्या जळून खाक; हवेत पसरले होते धुराचे लोळ

भारत नाईक | मोहोळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहोळ मंद्रूप महामार्गावर घडला अपघात, कोट्यावधी रुपयांचे नुकसान

मोहोळ मंद्रूप महामार्गावर मोहोळ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टॅँकरची व मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये केमिकलच्या टँकरने पेट घेतल्यामुळे दोन्ही गाड्या जागीच जळून खाक झाल्या असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दि. 22 रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

मोहोळ कडून मंद्रूप कडे निघालेल्या केमिकलच्या टँकरची मंद्रूप कडून मोहोळ कडे येणाऱ्या कंटेनर सोबत समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात टँकरने पेट घेतल्याने कंटेनर लाही ही आग लागली. तब्बल दोन तास दोन्ही वाहने जळत होती. अग्निशामक दलाची यंत्रणा येईपर्यंत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने यामध्ये काहीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस कर्मचारी निलेश देशमुख व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोहोळ कडून मंद्रूप कडे व मंद्रूप कडून मोहोळ कडे वाहतूक करणारी सर्व वाहने एक ते दीड किलोमीटर अंतरावर थांबवली.लोकनेते साखर कारखाना अनगरचे अग्निशामक दलाने व चिंचोली एमआयडीसी अग्निशामक दलाने आग विझविली. अपघातानंतर कंटेनर चालकाचे पाय गाडीचा अडकून तो जखमी झाला होता त्याला परिसरातील शरद गाढवे, महादेव गाढवे, ऋषिकेश माने यांनी दरवाजा तोडुन बाहेर काढत त्याचा जीव वाचविला . सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...