आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर:केंद्राने राज्याची देणी वेळेत द्यावी, देणी दिली तर मदत मागावी लागणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे तुमचे सरकार, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते बाहेर पडले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मदत किती करावी यांची माहिती गोळा करतो आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही असे ते म्हणाले. पुढे बोलतना ते म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे सरकार आहे. हे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. आपत्ती मोठी आहे. धोका कायम आहे. सावध राहा. केंद्राने राज्याची देणी वेळेत द्यावी. देणी दिली तर मदत मागावी लागणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...