आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅरिटी हॉस्पिटलच्या मुसक्या आवळणार:प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्ष उभारणार; कक्षाचे प्रमुख चिवटे यांची माहिती

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मदाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार केले जात नाहीत. याबाबत राज्यभरातून तक्रार प्राप्त होत आहेत. तरी चॅरिटी हॉस्पिटलसमावेत पंधरा दिवसातच मुसक्या आळवल्या जातील.

त्यासंदर्भात जिल्हाधिकारी व धर्मदाय कार्यालयातील प्रमुख अधिकारी व आरोग्य मंत्र्यांना विनंती करून लवकरच सोलापूर शहरात शहरात बैठक लावली जाईल. 10 टक्क्यानुसार बेड राखीव ठेवून उपचार न देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल.असा सजग दम मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्यकारी आधिकारी मंगेश चिवटे यांनी दिला आहे. रविवारी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साेलापूर दौऱ्यावर आले होते.त्याचा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

विविध रुग्णोपयोगी काम

पुढे बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के खाट राखीव असतात. त्याची माहितीही हॉस्पिटलने दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र काही हॉस्पिटल माहिती फलक लावत नाहीत. त्यांना लावण्यास भाग पाडू. असे बाेलून चिवटे म्हणाले मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे विविध रुग्णोपयोगी काम केले जात आहे.

नागरिकांना चष्मा वाटप

कोविडच्या काळात राज्यातील 250 रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. तसेच गरजू रुग्णांच्या विविध प्रकारच्या 16 हजार शस्त्रकिया सलवतीच्या दरात केलेल्या आहेत. तसेच दोन लाख नागरिकांना चष्मा वाटप केले आहे. तसेच गडचिरोली भागातही आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत.

वैद्यकीय सहाय्यता जिल्हा वाररुम

प्रत्येक जिल्ह्यातील गरजू रुग्णांची गैरसोय टाळावी,वैद्यकीय मदत तात्काळ मिळावी याठी सोलापूरसह राज्यातील 26 जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सहाय्यता कक्ष व वाररुम केली जात आहेत. त्याठिकाणी काम कामकाज करण्यासाठी स्वयंसेवक व आरोग्यदूत सारखे कर्मचारी नियुक्ती केली जात आहे. सोलापुरातही तिघांना नियुक्त पत्र दिले आहे. तसेच काही रुग्णांचा महागड्या शस्त्रक्रिया असतील त्यांना वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत घ्यावी, तसेच मुंबईमध्ये ही सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येतील अशी ग्वाही ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...