आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:प्रिसिजन व बैठक फाउंडेशनमुळे मुलांमध्ये संगीताची वाढतेय अभिरुची

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणापासूनच मुलामुलींना कलेचे अंग मिळावे. त्यांच्यातील प्रगल्भता वाढवली अभिरुची वाढवली तर समृद्ध आणि तणावमुक्त आयुष्य त्यांना लाभू शकते. अशा भावनेतून पुण्याच्या बैठक अॅट स्कूल फाउंडेशन आणि सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या कार्यक्रमांपासून दूर असणाऱ्या शाळांमध्ये संगीत मैफलींची बैठक सुरू केली आहे. या उपक्रमातून सोलापुरातील मुलामुलींना समृद्ध कलेचा वारसा मिळावा, भारतीय संगीताचा इतिहास जाणता यावा, वाद्यांविषयी माहिती मिळावी अशी भूमिका ठरवण्यात आली आहे. याला सोलापुरातील शाळा आणि विद्यार्थिनींचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

ई लर्निंगचे किट असो किंवा मग सर्व कष्ट लैंगिक शिक्षण व मासिकपाळीचे ज्ञान असो प्रिसिजन नेहमीच आपल्या परीने सोलापुरातील लहान या विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळी माहिती पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्याच पाऊलवाटेवर पाय ठेवत पुन्हा एकदा प्रिसिजन फाउंडेशनने पुण्याच्या बैठक फाउंडेशनच्या मंदार कारंजकर आणि दाक्षिणी आठल्ये यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील कलेपासून वंचित असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन वाद्यांची आणि भारतीय शास्त्रीय गायनाची परंपरा बैठकीच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याला सोलापुरात उत्तम प्रतिसाद मिळत असून, आजवर तीन शाळांमध्ये हा कार्यक्रम झाला आहे. मुलांना अगोदर कार्यक्रम करून दाखवणे. रागाची, वाद्याची अशी सगळी माहिती दिली जात आह.े यातून विद्यार्थ्यांना कलेविषयी आकर्षण वाटावे, अभ्यासाबरोबरच त्यांनी कलेतही आपल्याला काही तरी करता यावे अशी उत्सुकता निर्माण करावी ही प्रांजळ भूमिका या उपक्रमामागे असल्याचे संयोजकांनी सांगितले.

संगीत माहीत नाही अशी मुलं बोलकी झाली
ज्या मुलांना भारतीय अभिजात संगीत म्हणजे काय हे माहीत नाही, सतार काय, सरोद काय, तबला काय, मृदंग काय शास्त्रीय गायन म्हणजे काय, हे ठावूक नाही अशी मुलं आता आवडीने संगीत ऐकायला लागली आहेत. ते अनेक प्रश्न विचारतात. तुमचे गुरू कोण ? तुमचा प्रवास कसा होता? या संबंधीची सगळी माहिती मुलं प्रश्नांमधून आपल्या समोरच्या कलाकाराला विचारून उत्तर जाणून घेतात. ही एक रसिक वर्ग तयार करण्याची प्रक्रिया असून, यात मुलं चांगल्या पद्धतीने तयार होताना पाहायला मिळत आहे या माध्यमातून संगीत वंचित मुलांपर्यंत पोहोचावं ही प्रामाणिक इच्छा आहे.
माधव देशपांडे, जनसंपर्क अधिकारी प्रिसीजन फाउंडेशन सोलापूर

बातम्या आणखी आहेत...