आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्याबालकांना 16 लाखांची मिळणार मदत

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोविडमुळे जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबांना आवश्यक सुविधा तसेच सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनाकडून पाच लाख, केंद्र शासनाकडून १० लाख, कोरोना मदत १ लाख असे एकूण १६ लाखांची मदत देण्याबाबत बालकल्याण विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतिदल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, पर्यवेक्षण अधिकारी दीपक धायगुडे उपस्थित होते.

कोविडमुळे जिल्ह्यात विधवा झालेल्या १८२५ महिलांना मिशन वात्सल्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा निवृत्ती वेतन आदी शासकीय योजनांचा लाभ मंजूर करावा. संबधित तहसीलदार कार्यालयाकडे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्राधान्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करावा. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठीही तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली. ज्या मुलांना पालक नाहीत अशा निराश्रीत बालकांना निवाऱ्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकेने निवारागृह उभारावी, अशा सूचनांही त्यांनी दिल्या.

विधवा १८२८ महिलांना योजनांचा लाभ...
जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एक पालक गमावलेले १०८४ बालके आहेत. दोन्ही पालक गमावलेली ४१ बालके आहेत. अशी एकूण ११२५ बालके आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या ४१ बालकांपैकी ४० बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ३७ अनाथ बालकांच्या पालकांना ५० हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून १७ अनाथ बालकांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या १८२८ महिला असून, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...