आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिसिजन कॅमशाफ्ट्स कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसअार) निधीतून चिंचणी गावात साैर पथदिवे बसवण्यात अाले. त्याचा लाेकार्पण साेहळा कंपनी अध्यक्ष यतिन शहा अाणि डाॅ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाला. हे दिवे स्वयंचलित यंत्रणेवर चालतात. संध्याकाळी सूर्यप्रकाश कमी झाला, की दिवे आपोआप लागतात. दिव्याखाली हालचाली झाल्या की त्याचा प्रकाश वाढतो, ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये अाहेत. संपूर्ण गावात अशा प्रकारचे ३५ सौर पथदिवे लागले आहेत.
चिंचणी ग्रामस्थांनी तब्बल १० हजारांपेक्षा अधिक झाडे लावली. ती उत्तम प्रकारे जोपासली. त्याने गावाला ‘मिनी महाबळेश्वर’ अशी ओळख मिळाली. अत्यंत स्वच्छ, शांत, निसर्गरम्य अशा चिंचणीची दखल देशाच्या ग्रामविकास खात्यानेही घेतली. ‘आदर्श ग्राम’ होण्याकडे चिंचणीची वाटचाल वेगाने सुरू आहे. चिंचणीकरांची ही जिद्द पाहून प्रिसिजनने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकास करण्याचा निर्णय घेतला. या आधी प्रिसिजनने गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी सौरऊर्जा संच दिला होता. गावाने केलेले काम पाहून भारावून गेल्याचे श्री. यतीन शहा म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.