आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Chincholi MIDC To Karamba Road Is Broken; The Wait For Hundreds Of Workers Is Dire, The Contractor And The Administration Have Forgotten About The Repairs| Marathi News

प्रशासनाचे दुर्लक्ष:चिंचोली एमआयडीसी ते कारंबा रस्ता खचला; शेकडो कामगारांची वाट बिकट, ठेकेदार व प्रशासनाला दुरुस्तीचा पडला विसर

उत्तर सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंबा ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चूनही नागरिकांचा प्रवास खड्ड्यातूनच आहे. चिंचोली कोंडी औद्योगिक वसाहतीला सोलापूर बार्शी महामार्ग व मराठवाड्याला जोडणारा रस्ता म्हणून वसाहत ते कारंबा हा अत्यंत सोयीचा आहे. कित्येक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर चार वर्षांपूर्वी या रस्त्याला मंजुरी मिळाली.

रस्त्याचे काम सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शनला मिळाले. त्यांच्याकडून हे काम राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या दोन ठेकेदारांनी काढून घेतले. यातील एका ठेकेदाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा त्यावेळी वारंवार केला जात होता. परिणामी रस्ता निर्मितीनंतर एकच वर्षात हा रस्ता खचला. रस्ता निर्मितीनंतर पाच वर्ष या रस्त्याचा दोष दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर होती. मात्र ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली नाही.

रस्ता दुरुस्तीचा अवधी बाकी
रस्त्याला खड्डे पडले आहेत. मात्र या रस्त्याचा दोष दुरुस्तीचा कालावधी अद्याप बाकी आहे. तो पूर्ण होण्याच्या आतच रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल. रस्त्यावरील एका भागावरील दोष दुरुस्ती पूर्ण करून घेतली आहे.
पी. के. मते, अभियंता

दुचाकीवरून प्रवास अवघड
चार वर्षांपूर्वीच रस्ता केला होता. मात्र रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याला खड्डे पडले. दुचाकीवरून या रस्त्यावरून जाणे मुश्किल झाले आहे. पण एमआयडीसीत जाणारा हा जवळचा एकमेव मार्ग आहे.
सैपन शेख, कामगार.

दोन पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी रस्ता आपसांत वाटून घेतला
या रस्त्याचे काम त्यावेळच्या युती पक्षाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी वाटून घेतले. यातील एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कामाचा दर्जा बरा असून, तो रस्ता अद्याप टिकून आहे. मात्र दुसऱ्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी केलेला रस्त्याचे काम सुरू असतानाच दर्जा सुमार असल्याची ओरड होत होती. प्रशासनाने भूमिका घेतली नाही.

बातम्या आणखी आहेत...